STORYMIRROR

Chandrakant Shastrakar

Romance

3  

Chandrakant Shastrakar

Romance

प्रेमाची बरसात

प्रेमाची बरसात

1 min
207

धुंद या चांद राती

असावा तुझा हात हाती

चांदण्‍याची साथ असावी

ता-यांची बरसात असावी

मी तुझ्या केसात गुंफावे

तू माझ्या मिठीत यावे

दोघांनीही हरवून जावे

विसरून जावे ‘तू-मी’ पण


शब्‍दांचे ते सूर नसावे

जगाचे संदर्भही नसावे

स्‍वप्‍नापरी ते विश्‍व असावे

अणूरेणूतही प्रेम दिसावे

हृदयावरती कोरीत जावे

प्रेममयी ते रेशमी क्षण


तुझ्या ओठांची पाकळी फुलावी

मी ही ती अलगद टिपावी

रातीला या सुगंध यावा

प्रणयालाही जाग यावी

असे अपुले प्रेम असावे

चंद्रानेही बघून झूरावे

हृदयानी मग गुंफत जावे

नात्‍यांची ती हळवी गुंफन


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance