Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Chandrakant Shastrakar

Others

3  

Chandrakant Shastrakar

Others

तुला पाहतो मी..

तुला पाहतो मी..

1 min
292


पहाटेच्या गोड स्वप्नात

पारीजाताच्या सुगंधात

हातात घेऊन हात

तुला पाहतो मी...


सकाळच्या कोवळ्या उनात

पाखरांच्या मंजूळ गाण्यात

वा-याच्या हळुवार स्पर्शात

तुला पाहतो मी...


दुपारच्या रखरखत्या उन्हांत

बहरलेल्या गुलमोहरात

श्रृंगार करतांना

तुला पाहतो मी ...


संध्याकाळच्या कातरवेळी

काळोखाची शाल पांघरून

येणा-या रजनीत

तुला पाहतो मी ...


रात्रीच्या गर्द काळोखात

चंद्राच्या मंद प्रकाशात

चांदण्‍यात फिरतांना

तुला पाहतो मी ...


Rate this content
Log in