स्वप्न सुंदरी
स्वप्न सुंदरी
आहे एक स्वप्न सुंदरी
जडले माझे मन जिच्यावरी ,
नयनाशी जेव्हा नयन जुळले
तेव्हा मज सर्व काही कळले ,
हीच माझी ती स्वप्नसुंदरी
जिच्यासाठी आलो मी या भूतलावरी ,
विचारते वेडी रोज मजला
सांग ना प्रिया कशी दिसते मी तुला ,
मग मी म्हणतो आहेस तू वेडी
तुला पाहिल्यावर मला राहत नाही कशातच गोडी ,
अशी आहे माझी स्वप्नसुंदरी .