स्त्री अत्याचार भीषण समस्या
स्त्री अत्याचार भीषण समस्या
आज भारताला स्वतंत्र होऊन ७२ वर्ष लोटून गेले, तरीही आजअशी एक भीषण समश्या आहे जी स्वातंत्र्याच्या आधीही होती आणि आताही. ती म्हणजे स्त्रियांवरील होणारे अत्याचार. आजची स्त्री अबला नसून सबला आहे. आजच्या स्त्रियांना ५० % आरक्षण आहे, हे हि खरं आहे. ती पुरुषाच्या बरोबरीने आज काम करू लागली. राष्ट्रपतीपासून ते ऑटोरिक्षा चालविण्याचे काम आज स्त्रिया करीत आहेत. म्हणतात गल्ली पासून दिल्ली पर्यंत त्यांचेच वर्चस्व आहे. तरीहि त्यांचेवर एवढा अत्याचार की होतोय ?
मी जेव्हा शाळेत पहिल्यांदा गेली तेव्हापासून रोज आम्ही जी प्रतिज्ञा म्हणतो ती म्हणजे "भारत माझा देश आहे .सारे भारतीय माझे बांधव आहेत ".......
अशी प्रतिज्ञा आपण रोज मिरवतो, सर्व स्त्रियांना आया बहिणी मानणारे आपण त्यांची अब्रू लुटतो . रोज वर्तमानपत्राचं पाहिलं पान पलटवलं कि , पहिलीच बातमी वाचायला मिळते कि , स्त्रियांवर अश्या प्रकारे अत्याचार झाला, कधी तिची अब्रू लुटली जाते तर कधी छेडछाड केली जाते, तर कधी तीच शोषण केलं जात.
संसार सांभाळायाला बायको पाहिजे, राखीची बांधायला बहीण, जन्म द्यायला आई पाहिजे मग जन्माला येणारी मुलगी का नको? की तिला गर्भातच मारलं जात, अरे स्त्री अशी मूर्ती आहे, जी या विश्वाला एका माळेत बांधून ठेवते.
असे म्हणतात,
"यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता "
म्हणजेच जिथे स्त्रिया संतुष्ट असतात, त्यांना जिथे योग्य तो सन्मान मिळतो त्याच कुटुंबावर प्रभूची महाकृपा होते .
म्हणून हे माणसा ..........
विसरू नको की तुझ्या जीवनाचा स्त्री आदर्श आहे. सीता, सावित्री, दमयंती विसरू नकोस कि तुझा उपास्य देव आहे, सर्वस्वत्यागी उमानाथ शंकर, लक्ष्मीपती विष्णू, विसरू नकोस कि तुझा विवाह तुझी धनदौलत तुझे जीवन यापैकी काहीही तुझ्या इंद्रियसुखासाठी नाही. हा सारा समाज महामायेच्या विराट छायेच्या खाली आहे. याचा कधीही विसर पडू देऊ नको.
म्हणून माझं तुम्हाला एकच सांगणं आहे, अरे शिवबा आणि स्वामी विवेकानंदांना घडविणारी ती सुद्धा एक स्त्रीच होती स्त्री हे उपभोगाचे साधन नसून ती या सृष्टीला चालवणारी वाहिनीच आहे. म्हणून तिच्याकडे एका मातेप्रमाणे बघा. ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी स्त्रियांवरील अत्याचार नाहीस करण्याचा प्रयत्न केला तसाच थोडासा आपणही प्रयत्न करूया. कारण स्त्रीच राहणार नाही तर हे जग सुद्धा राहू शकणार नाही.
मग स्त्रीयांवरील अत्याचाराला जबाबदार कोण ?????
