सप्तसूर
सप्तसूर
सप्तसूर उमटले
नाद ओठी स्पर्षले
लय तालाच्या संगमाने
आसमंत दुमदुमला
भेदून सारे सूर नव्याने
उमटलेत नाद पुन्हा हे
पैंजण वाजे माझे रुणझुण
तुज्या नायनाच्या ठेक्याने
नाचू दे मला ही आज
करुनि नवा शृंगार साज
नकळत तुझीही पाऊले थबकवी
अन गजऱ्याचे फुल उमलले
तुझी लय अन माझे ताल मिळून
आसमंत सारे दुमदुमला

