स्पर्धेसाठी कविता -आधार
स्पर्धेसाठी कविता -आधार
सोडुनिया गेले सारे
सख्या तुझाच आधार
मज टाकूनी एकटा
बांधू नको नवे घर
घाम गाळून उन्हात
केले रक्ताचे हे पाणी
दारिद्र्याच्या संसाराला
गोंजारल मोत्यावानी
झोळी पाठीला बांधून
उन्हामध्ये चाले काम
घाम पाजळे अंगाचा
कष्टासाठी उभी ठाम
सारं सोडुनिया धनी
आज वाऱ्यावर आलो
पोटच्यांनी लुटुनिया
आज भिकारी हो झालो
घरदार शेती तुम्ही
त्यांच्या नावावर केली
जगी आधार संपला
पहा काय दशा झाली
चोहीकडे बघा आता
कसे आभाळ फाटले
दुःख पाहुन जन्माचे
अश्रू डोळ्यात आटले
धरू नका दुःख धनी
मन होत सुनं सुनं
तुझ्या अगोदर व्हावं
माझ्या आयुष्याचं सोनं
