STORYMIRROR

Shobha Wagle

Romance Inspirational

3  

Shobha Wagle

Romance Inspirational

सोबत क्षणांची

सोबत क्षणांची

1 min
178

सोबत क्षणांची

पवित्र प्रेमाची

गोड आठवांची

सुंदर नात्यांची....१


स्मरते अजून

तो नदी किनारा

तुझा माझा होता

एकच निवारा.....२


रम्य सांजवेळ

ती घालवलेली

नदीच्या पाण्याने

शिंपण केलेली.....३


राहिला तो गाव

पाणी ते आटले

पण तुझे माझे

प्रेम हे दाटले.....४


सोबत असावी

तशाच क्षणांची

सुंदर स्वप्नांची

मधुर प्रेमाची.....५


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance