STORYMIRROR

जयश्री चव्हाण

Romance

3  

जयश्री चव्हाण

Romance

सख्या रे जगते मी

सख्या रे जगते मी

1 min
26.3K


सख्या रे जगते मी

तुला स्वप्नात पाहताना

ओठांवरती हसू फुलते

तुझे निरागस रूप पाहताना...

स्पर्श तुझा भासतो

तू जवळ नसतांना

दुर असूनही जवळ असतो

आठवण तुझी करताना...

आसवांच्या सरी बरसतात

तुला डोळ्यात साठवताना

कंठ दाटून येतो

चंचल ह्रदय सावरताना...

सांज होऊनी जाते

स्मरण तुला करताना

कातळवेळ घायाळ करते

विरह तुझा छळताना...

नभ भरूनी येती

नजरे आड तू होताना

सागरालाही ओहटी येते

एकांतवास असा घालवतांना...

चाहूल जाणवते तुझी

वाट अशी सरतांना

खोल ठसे उमटतात ह्रदयी

तू दुर-दुर जातांना....


Rate this content
Log in

More marathi poem from जयश्री चव्हाण

Similar marathi poem from Romance