सहवास
सहवास
सहवास हा गुंतवतो
तुझ्यात मला हरवते
कारण... सहवास तुझा
मला हवाहवासा वाटतो
तुझ्या चिंतेत, तुझ्या आठवणीत
मन हे माझे गुंतते,
तुझ्या आठवणी॓ंचा सहवासात
मला सगळ्याची विसर पडते
मन हे बावरते
तुला बघून खदकन हसते
तुझ्यात ते अजून गुंतते
गुंता हा सुटत नाही.. कारण..
तुझा सहवास हवाहवासा वाटतो
तुझ्या येण्याने, तुझ्या साथीने
मन चांदण्यात न्हाले
सहवास तुझ्या सोबतीचा
सुटता का सुटेना...

