शृंगारिक लावणी
शृंगारिक लावणी
मदभरी रात ही आली
गालावरी खुले ही लाली
फुले जशी गुलाब कळी
केसात गजरा हो माळी
तुम्हा पाहून राया भानावर न राही अशी
स्वप्नामधलं रूप दिसं जणू अप्सरा जशीllधृll
मनातील मोर माझ्या हो नाचतो
तुमच्यासाठीच जीव हा झुरतो
माझा देह कापूस तुम्हा वहाते
तुमच्या पिरतीत चिंब मी होते
सांगा राया तुम्ही मज मना आवरु हो कशी
स्वप्नामधलं रूप दिसं जणू अप्सरा जशीll१ll
यावं मज असं जवळी हो घ्यावं
असा राया रंगात येऊद्या डाव
रात जागवू दोघं मिळून सारी
राया मी हो तुमचीच स्वप्नपरी
नाचे मी तनमन साजे दरबारी अशी
स्वप्नामधलं रूप दिसं जणू अप्सरा जशीll२ll

