शोध माझ्यातल्या तुझा
शोध माझ्यातल्या तुझा
मला तू आवडतोस...
यालाही कारण असतं?.....
पण म्हणतात की शोधलं की सापडतं
म्हणून मग सुरु केला शोध माझ्यातल्या तुझा...
जवळ असता, नाही सुचले कधी
मला तू का आवडते, मना नाही विचारले कधी
मला तू का आवडते, कारण नाही शोधले कधी
किती मनोरम ते हसणे
अन त्या नजरेतील भाव
किती मनोहर मनीचा स्पर्श
मला आवडते, तुझ्यात हरपून जाणे
प्रत्येक क्षण, तुझ्या सोबत घालवणे
तुझ्या कुशीत, शिरणे आणि हरवून जाणे
किती मनोरम आहेत ते क्षण
किती मनोरम आहेत त्या आठवणी
आठवणीत, शोध माझ्यातल्या तुझा...

