STORYMIRROR

Krutika Kamble

Romance Tragedy Inspirational

3  

Krutika Kamble

Romance Tragedy Inspirational

सारे जहाँ से अच्छा..

सारे जहाँ से अच्छा..

1 min
20

सारे जहाँ से अच्छा है ये हिंदुस्तान हमारा 

लहानपणापासून खुप वेळा ऐकला नारा

पण खरच आहे का असे देश आपला प्यारा 

देशात चाले काय याचा अंदाज आहे का खरा


कुठे जातीवरून भांडणे कुठे रक्तपात होतो

कुठे विश्वासघात तर कुठे नरबळी हा जातो

आपल्याकडूनच प्रेमाचा खून करण्यात येतो

पाठीत खंजीर खुपसून सखा मैत्रीचा घोट घेतो


नाहक असे कारण विनाकारण होई घातपात

भ्रष्टाचारामुळे भररस्त्यात घडतो मग अपघात

कसं म्हणावे मग सर्वांहून चांगला भारत माझा

जिथे खोटेपणाची सत्यावर सहज करूनी मात


बोलावे तैसे करावे म्हणून बांधा चंग उरी नवा

घडवू पुन्हा एकदा हा भारत देश सुंदर असा

जिथे नसे भेद नसे कोणताही वाद जनमाणसा 

सुज्ञान नागरीक होऊन करू भारत देशास उभा


©® कृतिका कांबळे 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance