ऋतू
ऋतू
ना उन्हाळा,ना पावसाळा,ना हिवाळा लागतो
प्रेम करायला कुठे ऋतु चा बहाना लागतो
ठरवले भिजायचे तिच्या सोबत पावसात
पण त्यातही तिच्या नजरेचा इशारा लागतो
नजर चुकली न पावसाचा थेंब पडला तिच्या ओठांवर
अलगद माझ्या ओठांनी तो उचलावा वाटतो
भिरभिरती नजर माझी स्थिरावली तिच्या केसांवर
सावरून त्यांना माझ्या मिठीत सहारा द्यावा वाटतो
हृदयाची गती वाढतेय वारंवार नकळत
त्याला तुझ्या ह्रुदयात चाललेला कलह ऐकावा वाटतो
पाऊस आहेच खरा बहाना तुझ्या जवळ येण्याचा
त्यात भर म्हणून नजरेचा वणवा पेटवावा वाटतो

