प्रवास
प्रवास
प्रवास खूप मोठा आहे
आणि कठीणही,
अवघड खूपच आहे,
पण अशक्य नाही
जो पर्यत चालत येईल,
तो पर्यत चालत राहा
पाय दुखले तर सांग मला
थोड्या वेळ थांबू या
थोड्या फार गप्पा गोष्टी
चहा सोबत मारु या,
थोडं तुझं थोडं माझं,
हळू हळू करून ऐकू या,
शब्दात कमी एकमेकांत
जास्त गुंतू या,
माझे पाऊल थोडं मागे पुढे
होऊच शकत
मला सांभाळणं आता
तुझ्या हातात आहे
थोडी रागीट थोडी रडूबाई
अशीच आहे मी,
पण आता फक्त तुझीच आहे मी.