STORYMIRROR

yogita kotkar

Romance

3  

yogita kotkar

Romance

प्रेमवेडा पाऊस

प्रेमवेडा पाऊस

1 min
373

आठवतो मला आजही तो पाऊस

आपल्या प्रेमाची पूरवायचा हौस ...... धृ


सरीवर सरी किती धुंद करायच्या 

भावनांच्या ओलाव्यात चिंब चिंब भिजवायच्या

डोळ्यांनीच सांगून जायचा,नको ना गं जाऊस

       आठवतो मला..... १


ओथंबलेले घन अन भिजले मन थांबवायचे कसे

काही शब्दातच सारे गाणे बसवायचे कसे

माहित होत त्याला म्हणूनच सांगायचा, नको ना गं गाऊस

         आठवतो मला..... २


कधी खोडकर कधी हळवा होऊन बरसायचा

डोळ्यातील अश्रूंना उगाचच पावसात भिजवायचा

मी बोलायच्या आतच म्हणायचा, नको ना गं पाहूस

         आठवतो मला....... ३


भर पावसात मुद्दामच छत्री विसरायचा

एका छत्रीत( छताखाली) येण्याचा बहाणा शोधायचा

मी बोलण्या आधीच कटू सत्य म्हणायचा, नको ना गं दृष्ट लावूस

        आठवतो मला..... ४



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance