पाऊस
पाऊस
1 min
224
कृष्णवेणू सूर तेथे
अलगद बरसले
प्राणिमात्र भूमायेचे
यासाठीच तरसले
कृपादृष्टी वरुणाची
ओलेचिंब झाले रान
धरतीच्या लेकरातं
त्याने भरले गं प्राण
दोर फासाचा कधीच
बाभळीला विसरला
त्याचा देव आज म्हणे
नवसाला गं पावला
मुखी पाऊस गाण्यांचे
उमटले मनी सूर
सखा येताच जवळी
आनंदाने भरे उर
अवखळ कधी कधी
नको तुझे रे वागणे
भरलेले हे आभाळ
रिते होण्या बरसणे
