STORYMIRROR

yogita kotkar

Others

3  

yogita kotkar

Others

जीवन एक रंगभूमी

जीवन एक रंगभूमी

1 min
749

येथेच कराव्या भूमिका

नात्यातील नात्यांच्या

गाजवावा हा रंगमंच 

होऊन ताईत गळ्याचा


तात्पुरता रंगमंच देतो

चूक सुधारण्यास वाव

जीवनाच्या रंगमंचावर

मात्र कर्तव्यांची धाव


कधी व्हावे कनवाळू आई

कधी व्हावे कणखर बाप

बदलून कराव्या भूमिका

हेच जीवन रंगभूमी माप


झोकून द्यावे आयुष्य

नात्यांच्या तालमीत

यशस्वी मग होतो

जीवनाच्या मैफिलीत


पडदा पडल्यानंतरही

टाळ्या वाजत राहतील

अशीच निभवावी भूमिका

जीवन रंगमंचातील



Rate this content
Log in