STORYMIRROR

Utkarsha Pawar

Romance

3  

Utkarsha Pawar

Romance

प्रेम

प्रेम

1 min
256

लहानपणापासून हा शब्द नेहमी ऐकत आलेय, 

पण या शब्दाचा नेमका अर्थ काय ? कोणालाच न कळे


जसजशी मोठी होत गेले, या शब्दाचे गूढ उलगडत गेले,

मी पण माझ्या राजकुमारासाठी अनेक स्वप्न रंगऊ लागले


ज्या दिवशी तो माझ्यासमोर स्वप्नातून सत्यात आला,

तो दिवस माझ्यासाठी अगदी अविस्मरणीय ठरला


दुसऱ्या दिवसाची सकाळ म्हणजे एकदम नवीन होती,

जनू काही आयुष्यात हवे असलेले सर्व काही तुला मिळाले ! हे सांगत होती


प्रेम कधी झालं ? कसं झालं ? मला माहिती नाही,

पण जसं झालं आणि जेवढं झालं तेवढं मनापासुन फक्त तुझ्यावर झालं !


हा आयुष्यातील सुंदर अनुभव सांगताना एक गोष्ट मला आवर्जुन सांगावी वाटते,

खरंच प्रेम काय आहे ते प्रेमात पडल्यावरच कळते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Utkarsha Pawar

Similar marathi poem from Romance