प्रेम
प्रेम
तुझ्या प्रेमात पडताच क्षणी
आयुष्य जगायचं रे कळलं
अबोल मनातील या प्रेमाशी
जन्मोजन्मीच रे नातं जुळल.
प्रेमाच्या या प्रत्येक परीक्षेत
झालो ग मी नेहमीच पास
तूला भेटावे या आतुरतेत
असते ग मजला हृदयात आस .
तूझ्या प्रेमाच्या या धाग्यात
मन व्याकुळ होऊन जाई
क्षणात दुर तू जाताच
जीव कासावीस माझं होई.
रोज तूला भेटण्यासाठी
असते ग मनात चाहूल
कसं व्यक्त करू भावना
प्रेमाचे हे निरागस पाऊल .

