महिला सक्षमीकरण
महिला सक्षमीकरण
1 min
1.2K
आज आठच मार्च का ?
याचं उत्तर की बाकी ,
दिवस स्त्रियांचे नाहीत का ?
पीडित कर्मकांडात
गुंतवून ठेवणाऱ्या
स्त्रियांना आठ मार्चला
मुक्ती दिन वाटतो का ?
स्त्री पुरुष अधिकार
हक्क मान्य केले तरी
समाज मानसिकतेतून
सावरेल का हो आजची नारी
सर्व क्षेत्रात आघाडी
आर्थिकदृष्ट्या सशक्त
कितीही संकट आले तरी
नाही पडणार अशक्त
ऐक राणी आहुती देते
जागृत देश रक्षणासाठी
अलौकिक स्त्री पराक्रम
महिला सक्षमीकरणासाठी .
