प्रेम
प्रेम
हो!
त्याला नाही येत
प्रेम व्यक्त करता,
हो!
त्याला नाही आवडत
सगळ्या समोर मिठीत घ्यायला,
हो!
त्याला नाही होता येत
रोमॅन्टीक व्यक्त व्हायला,
हो!
त्याला नाही देता येत
सरप्राइज ऐन मोक्याला,
हो!
त्याला नाही आवडत
माझे फोटो स्टेटसला ठेवायला,
पण,पण,पण,
याचा असं अर्थ असा नाहीये कि
त्याचं माझ्यावर प्रेम नाहीये,
तो थोडा शांत आहे
सगळ्यांसमोर नाही
व्यक्त होता येत त्याला,
पण,
माझ्या सक्सेस मध्ये
मनापासून आनंदी होता येतं त्याला,
मला मोटीव्हेट करता येतं त्याला,
माझ्या आई बाबा एवढी
काळजी घेता येतं त्याला,
माझे अश्रू पापणी पर्यंत येताच
पुसता येतं त्याला,
आणि
हो!
आभाळाएवढं प्रेम ही करता येतं त्याला,

