प्रेम
प्रेम
प्रेम अंतर्मनातील
हृदयस्थ भावना
इंद्रधनुच्या सप्तरंगातील
एकजीव रंग
रेशीमकोशातील एक
नाजूक बंध
बरसणाऱ्या पावसातील
चातकाची तहान
निरागस ओढीची
अगम्य भेट
केवडयाच्या वनातील
सुगंधी बहर
गुंतता गुंतता
उलगडत जाते
उलगडता उलगडता
गुंततच जाते
निशब्द,विश्वस्थ
हळूवार अलगूज
वाहणाऱ्या प्रवाहातील
आश्वस्थ लहर म्हणजे प्रेम..!

