फक्त मीच असेन - I'll be the only one
फक्त मीच असेन - I'll be the only one
आयुष्यभर तुझ्यासोबत मीच असेन
तू हसताना तुला हसवणारी मीच असेन
तू रडताना अश्रू पुसणारी पण मीच असेन
तू वाटेवर चालताना वाट पण मीच असेन
वाटेत चुकला तरी वाट दाखवणारी पण मीच असेन
तू शेतावर काम करताना दुपारी तुझ्यासाठी कांदा-भाकर घेऊन येणारी मीच असेन
तुला घाम आला म्हणून पदराने घाम पुसणारी पण मीच असेन
नदी ओलांडताना तुझा हात धरणारी पण मीच असेन
गुढीपाडव्याला तुझ्यासोबत नऊवारी नेसून गुढी उभारणारी पण मीच असेन
माॅलमध्ये जीन्स-टाॅप घालून फिरायला जाताना पण मीच असेन
तू हात धरलास म्हणून लाजणारी पण मीच असेन
तुझ्यासोबत पिझ्झा खाताना पण मीच असेन
तुझे फोटो चांगले आले तर ते काढणारी पण मीच असेन

