STORYMIRROR

Mansi Namdar

Romance Others

3  

Mansi Namdar

Romance Others

पहाटवारा

पहाटवारा

1 min
11.9K

पहाटेच्या नीरव शांततेत, 

   तूझी आठवण करून देतो हा पहाटवारा

दवबिंदूच्या वाटेवरून चालताना, 

   तूझी आठवण करून देतो हा पहाटवारा

साखरझोपेत असताना तुझ्या आठवणींचें, 

   प्रीत जगवतो हा पहाटवारा

तू जवळ नसतानाही, 

   तूझा सहवास भासवतो हा पहाटवारा

तुझ्या आठवणींचें रूप घेऊन, 

   नकळत मुखावर हास्य फुलवतो हा पहाटवारा

अविस्मरणीय आठवणींच्या जगात, 

  नेऊन झुलतो हा मंद पहाटवारा

अस्वस्थ असताना हळूवार झुळूकेतून, 

   तू सोबत असल्याची जाणीव करून देतो हा पहाटवारा

ध्यानीमनी अन् स्वप्नांच्या जगात, 

   तुझा सहवास मनामनात झुरवतो हा पहाटवारा...


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

Similar marathi poem from Romance