समुद्र किनाऱ्यावरील इच्छा
समुद्र किनाऱ्यावरील इच्छा
समुद्रावरील शांततेच्या एकांतात,
मला तुझ्यामधे हरवून जायचे आहे...
लाटांच्या ध्वनिसमवेत,
मला तुझ्या हृदयाची स्पंदने ऐकायची आहे...
किनार्यवरील सूर्यस्ताचे दृश्य,
मला तुझ्या नयनात साठवून पहायचे आहे...
निसर्गाचे मनोहर दृश्य,
तुझ्या हातांच्या सोबतीने रेखाटून स्वच्छ अन् निर्मळ प्रेमाच्या रंगांनी रंगवायचे आहे....

