STORYMIRROR

Aishwarya Nalawade

Romance

3  

Aishwarya Nalawade

Romance

ओढ

ओढ

1 min
26.8K


ओढ

ओढ, कुणीतरी असायला हवे याची

ओढ, खिडकीच्या फटीटून सूर्याची किरणे डोळ्यावर आली की जेव्हा साखर झोपेचे अस्तित्व डगमगायला लागते, तेव्हा हळूच ते पडदे बंद करणाऱ्या त्या काळजीची

ओढ, त्या नंतर कपाळवर होणाऱ्या अलगद ओठांच्या स्पर्शाची

ओढ, सकाळी कुशी बदलली की त्याच्या श्वासांच्या जाणीवेची

ओढ, सकाळच्या स्नानानंतर श्रृंगार करायची ज्याच्यासाठी इच्छा व्हावी त्या व्यक्तीची

ओढ, ती ओल्या केसांची लट जेव्हा डोळ्यावर येऊन पेपर वाचण्यात अडथळे निर्माण करते तेव्हा तिला हळूच कानाआड करणाऱ्या त्या हातांची

ओढ, कामवरून दमून थकून घरी आल्यावर चहा करत असताना अलगद मागून येऊन आलिंगन देणाऱ्या त्या हातांची

ओढ, त्याच्या प्रत्येक अवघड क्षणात त्याच्या बरोबरीला ठाम उभ्या राहणाऱ्या त्या स्वताःच्या प्रतिबिंबाची

ओढ, रोज रात्री झोप हडपून आयुष्याची टेंशन्स यशस्वी होउ नयेत म्हणून त्याच्या डोक्याला केलेल्या त्या तेलाच्या मालिशीची

ओढ, त्याची- तुझी


Rate this content
Log in

More marathi poem from Aishwarya Nalawade

ओढ

ओढ

1 min read

Similar marathi poem from Romance