ओढ पावसाची
ओढ पावसाची

1 min

14
ओढ पावसाची,
मेघ पावसाचे होऊ दे
थोडे 'तिथे' आणि
थोडे 'इथे' बरसु दे
माझे तडपणे बहुदा
त्याला ठाव नाही
पावसाने त्याचेही
मन थोडे तरसु दे
पावळ्यांची रांग माझ्या
दारापुढे लागली
पसा माझा रिता,
त्याचा तरी भरू दे
बरस तुला हवे तेवढे,
हवे तेवढे त्यालाही
सरल्यावर एक थेंब बस,
मजसाठी उरू दे