STORYMIRROR

Amita Paithankar

Inspirational

3  

Amita Paithankar

Inspirational

निशेच्या गर्भातून

निशेच्या गर्भातून

1 min
1.5K

संजीवनी द्यावीशी वाटे कधी

आठवांना

खोल पाताळात गाडल्या

भावनांना

आर्त साद ,परि अडवावे का

आवेगानां

ठरल्या रीतीने भिरकावलेच ना

स्मृतींना

की कुरवळावे अनंता पर्यंत असेच

साठव्यांना

तू दिलेल्या परमप्रिय जीवस्य

त्या क्षणांना....

वाटे कधी पुरे पुरेच झाले आता

निर्माल्य त्या फुलांचे कुठवर सांभाळावे

रीतीने दिवस संपतो

निशेच्या गर्भातून उत्कटसा

अंकुर ही नवा फुटतो

संपल्याने सुरुवात नव्याची होते

जुना मी कणाकणाने मरत जातो की,

नवा मी गर्भवास भोगून पुन्हा येतो


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational