STORYMIRROR

jay pawar

Abstract Others

3  

jay pawar

Abstract Others

●नौकरी●

●नौकरी●

1 min
377

तुझ्या प्रेमात झालो मग्न,

 तू जवळ नसल्याने कोणीच करत नाही लग्न.!!


  तुला प्राप्त करणारे किती भाग्यवान,

समाजात मिळते त्यानाच मान !!


तुझ्या साठी तरुणांनी घरदार सोडलं,

भाड्याच्या पैश्यासाठी पार्ट टाईम जॉब केलं.!!


तुला प्राप्त करायचं मनात ध्यास,

तूच तर आहे बेरोजगारांच्या जीवनाचा श्वास.!!


क्लास कट्टा, लॅब कट्टा, चाय कट्ट्यावर तुझ्याच गोष्टी,

सर्व बेरोजगाराची तुझ्यावर दृष्टी.!!


तुला प्रपोज करण्यासाठी खूप सारे फॉर्म येतात,

सर्वच बेरोजगार तुझ्यासाठी जीवाची बाजी लावतात.!!


ये नौकरी काहींना तू सहज मिळते,

काहींना तू ऐवढ का? छळते.!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from jay pawar

Similar marathi poem from Abstract