STORYMIRROR

Swaraj Wagh

Romance

4  

Swaraj Wagh

Romance

नातं तुझं-माझं

नातं तुझं-माझं

1 min
651

आकाश अन् धरणीचं 

तुझं-माझं नातं,

जरी दिसतो वेगळे

एक प्राण एक ज्योत!


चार डोळे-तुझे माझे 

क्षण एकच जपती,

हात कोणते सांग दारी 

लावती सांजवाती!


तुझ्या-माझ्या हृदयात 

घर दोघांचे सजले,

तुझ्या डोळ्यातले थेंब 

गाली माझ्या ओघळले!


तुझ्या मुखातून मी

घास मला भरवते,

तुझ्या-माझ्या अंतरात 

मन एकच खेळते!


तुझी-माझी सावली

तुझ्या कधी माझ्या संगे,

तुझी-माझी प्रित सख्या 

डाव आयुष्याचा रंगे!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance