STORYMIRROR

Ajinkya Bhujang

Romance

3  

Ajinkya Bhujang

Romance

न पाहता

न पाहता

1 min
29.8K


न पाहता.. न पाहता..

मन हे माझे झाले तुझे.. ना कळे हे होते कसे..

जीव माझा का गुंततो, तुझ्याचसाठी का झुरतो..


न पाहता, तुला न पाहता..

बावरलो कसा, तुला न पाहता...


न पाहता.. न पाहता..

जग हे वाटे सारे नवे.. भावनांचे उडती थवे..

तगमग का काळजाची.. वाढे ओढ भेटीची...


न पाहता, तुला न पाहता..

बावरलो कसा, तुला न पाहता...


न पाहता.. न पाहता..

साथ दे तू माझी जराशी, ना वाटे भीती कशाची..

शब्द शब्द मी वाचतो, वाचुनी पुन्हा का हासतो...


न पाहता, तुला न पाहता..

बावरलो कसा, तुला न पाहता...


Rate this content
Log in

More marathi poem from Ajinkya Bhujang

Similar marathi poem from Romance