STORYMIRROR

devashri chakkarwar

Abstract

4  

devashri chakkarwar

Abstract

मृदगंध

मृदगंध

1 min
370


 ( मनोरम शब्दावली काव्य प्रकार )

4 ओळी, 4 हि ओळीतील पहिले अक्षर हे मराठी बाराखडीतील क्रमवार अक्षरे , प्रत्येक ओळीत फक्त तीनच शब्द , दुसऱ्या व चौथ्या ओळीचे शेवटचे अक्षर स्वर यमक जुळले पाहिजे , 

ष ण ळ ङ ञ हि अक्षरं वर्ण येतील तेव्हा स्वर वापरायचा ( अ आ पासून अं पर्यंत कोणताही स्वर )


   *अक्षरे* -- *म य र ल* 

  *म* मृदगंध मातीचा दरवळतो 

    *य* येतो वास सुगंधाचा 

  *र* रोपटे दिसते इवलूशे 

   *ल* लेवूनि साज चैतन्याचा *||1||* 


   *अक्षरे* -- *व श ष स* 

  *व* वाऱ्यासंगे मस्त डुले 

    *श* शालू नेसूनि हिरवा 

  *ष* (स्वर) अनोखी सळसळ आनंदाची  

    स सारा विश्वची हरला *||2||* 


   *अक्षरे -- ह ळ क्ष ज्ञ* 

  *ह* होतसे आनंद पाहुनी 

   *ळ* (स्वर ) अनोख्या चैतन्याची सळसळाट 

  *क्ष* क्षणोक्षणी पाहुनी निसर्गाकडे  

    *ज्ञ*  ज्ञानाची होते भरभराट *||3||* 


    *अक्षरे --- क ख ग घ* 

  *क* किरणांनी त्या सूर्याच्या 

    *ख* खुश होतसे धरणी   

  *ग*  गोळा होती पक्षी 

   *घ*  घडे निसर्गाची मांडणी *||4||* 



Rate this content
Log in

More marathi poem from devashri chakkarwar

Similar marathi poem from Abstract