मन
मन


सुवास फुलांनी भरुनी जाईल हातांची ओंजळ
मनास सुखावते जसे तुझ्या नयनांतले काजळ
तुला सजलेले बघता माझे भरकटे ध्यान
भाबड्या मनाची समजूत मग काढ़तेच मन
श्रृंगार पाहून पडतात गुलाबही फिके
तुझ्या आजुबाजूला जणू दाटतेच धुके
वाटते कधी तू अवघड प्रश्नाचे एक उत्तर सोपेसे
जसे किनारी उठती आपल्या पावलांचे ठसे