मला तुझं व्हायचंय
मला तुझं व्हायचंय
भिरभिरणाऱ्या फुलपाखरासोबत,
मला फुलात जायचंय,
पावसाचा पहिला थेंब होऊनी,
तुझ्या गालावर थांबायचंय,
तू माझी मला तुझं व्हायचंय..!!१!!
तुझ्या मिटलेल्या डोळ्यांच्या पापणीत,
मला स्वप्न बनून राहायचंय,
शब्द माझे असले तरी,
कविता होऊनी तुला सांगायचंय,
तू माझी मला तुझं व्हायचंय..!!२!!
रुणझुणणारा वारा होऊनी,
तुझ्या कानात काहीतरी गुणगुणायचंय,
तू माझी नाही झाली तरी, तुझा
श्वास होऊनी तुझ्या हृदयात जायचंय,
तू माझी मला तुझं व्हायचंय..!!३!!
चकोर होऊनी, तुला
आयुष्यभर पाहत राहायचंय,
अश्रू माझे असले तरी,
तुझ्या डोळ्यातून ओघळायचंय
तू माझी मला तुझं व्हायचंय..!!४!!

