"मी अलगद तुला स्वप्नात पहाव.."
"मी अलगद तुला स्वप्नात पहाव.."
मी अलगद तुला स्वप्नात पाहाव
आणि तु खरच माझ्या समोर याव
हळूच मला हलवावे नी डोळे ऊघड म्हणाव
मला अजुनही ना ऊमगावे की तु खरच
आलायस नी माझ्याकडे एकटक पाहतो आहे
माझा संभ्रम तुझ्या ध्यानी यावा
नी तू मला तंद्रीतून बाहेर काढाव....
मी अलगद तुला स्वप्नात पहाव
माझा हात हातात घ्यावा नी मला चल म्हणाव
मीही होकार द्यावा नि तु नेशील तिकडे चलाव
तुझ्याबरोबर सातासमुद्रापार जाव
नि एवढा प्रवास कधी केला हेही ना कळाव....
मी अलगद तुला स्वप्नात पहाव
तु प्रेमाने मला दोन्ही हाताने ऊचलाव
नि मी लाजून हळूच तुझ्या डोळ्यात पाहव
तुझे डोळे माझ्या डोळ्यांशी भिडावे
नि मी माझे मुख ओंजळीने झाकावे
नि तु हात बाजूला सारून माझ्याजवळ बसाव....
मी अलगद तुला स्वप्नात पहाव
एकमेकांना एकमेकांचे हात स्पर्शावे
नि दोघांनीही मोहरून जाव
माझ्या वाढत्या ह्रद्याच्या ठोक्यांनी
तुझ्या श्वासाची गती वाढवावी
नि तुझ्या श्वासाच्या वेगाने
माझ्या ह्रद्याचा ठाव घ्यावा
हळूहळू श्वासाची गती मंद व्हावी
ह्रद्याचे ठोके जागेवर यावे
नि मी तुझ्या नि तु माझ्या मिठीत विसाव
नि आसमंताने आपल्या भोवताली फिराव...

