मी अजून जीवंत आहे...
मी अजून जीवंत आहे...
अजून तरि माझा
इथला श्वास बाकी आहे..
दगड झालो असेन तरिही
घडणं अजून चालू आहे..
त्या दगडांतून साकारेंल
शिल्प ऊद्याचें नवें..
जगायला पैसा नको मला
फक्त तूमचे बोल हिंमतीचे हवे..
ऊगांच का सोडू आशा
मी अजून हरलो नाही..
इथल्या दु:खाला अजूनतरि
मी भीक घातली नाही..
तू फक्त सोबत रहा
मी आणखा काही मागत नाहीं
अहो, जन्म मरण तर येतच असतं
मी अजून तरि मेलो नाही
मी अजून तरि मेलो नाही...
