मी आणि तू
मी आणि तू
कोण तू कोण मी
प्रश्न घालतो डोक्यात पिंगा ।
मी मी चा पाढा चाले
तुही कसा रे आहेस भुंगा ।
होतो मी कधी असा
डोक्यात भरला स्वार्थ जसा ।
माणुसकी तर गेलो विसरून
लुबाडणुकीचा बांधला वसा ।
दया माया नाही उरली
बुद्धी भ्रमात केव्हाच सरली ।
विनाशाच्या वाटेवरती
प्रेमळ ममता केव्हाच हरली ।