मैत्रीचे ऋतु
मैत्रीचे ऋतु


मैत्रीच्या वेलीवर फुले प्रेमाची बहरावी..!!
ओढ मनाची डोळ्यातून दिसावी..!!
प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्दांची गरजही न पडावी..!!
अशा या प्रसंगी साथ निसर्गानेही थोडी द्यावी,
ढगांच्या मर्जीने प्रेम ऋतुची सर पडावी..!!
मस्ती थोडी मग विजांनीही करावी...!!
त्यांच्या भितीने तिने अलगद मिठी मारावी..!!
पहिल्या प्रेमाच्या या पहिल्या पावसात, दोघांचीही मने भिजावी...!!!