मार्ग बदलुन मी
मार्ग बदलुन मी
मार्ग बदलुन मी
तुला भेटणे नाही जमले मला
कित्येक पाहिले मार्ग बदलून मी
तुझ्याशी किती किती मला बोलायचे
सर्वच धडे ठेवले आज लिहुन मी
किती वेगळा वाटत होतास तु
आज पाहिले तुला जवळुन मी
तुझ्या सोबत प्रेमबंधाच्या प्रवाहात
घेतले जीवन तुझ्यासोबत वाहुन मी
सुखदुःखाचे चटके असो वा चांदणे
तुझ्या सोबत निघाले न्हाऊन मी
दुर्गा देशमुख

