माझ्या श्वासात तू...
माझ्या श्वासात तू...
डोळ्या पुढे सदा, दिसतेस तू
माझ्या स्वप्नात तू, माझ्या श्वासात तू....
तुझ्या आठवणींचा, मी बांधला झुला
त्यात दिसतेस तू, माझ्या श्वासात तू.....
मला भेटण्यास, रोज झुरतेस तू
सांज सकाळी रडतेस तू, माझ्या श्वासात तू...
ही ओढ तुझी, प्रीत केलीस तू
प्रेम कथा मनी स्मरतेस तू, माझ्या श्वासात तू...
मी हरवून बसलो, स्मरण करतेस तू
साद घालतेस तू, माझ्या श्वासात तू....
गोड शब्दातले, तुझे ते बोलणे
गोड हसतेस तू, माझ्या श्वासात तू....
तुझ्या ओठातला गोडवा, अमृताचाच ठेवा
माझ्या मिठीत तू, माझ्या श्वासात तू....
कसा विसरेन मी, स्मित ओठातली
माही थकलीस तू, माझ्या श्वासात तू.....