माझी कविता
माझी कविता
प्रथमच त्याला पाहिले
नजरानजर झाली
मनाची बांधलेली गाठ
तेथेच सैल झाली
त्याची एक नजर
काही बोलुन गेली
मनात दडलेली कळी
गालावर खुलून आली
जवळ येऊन बोलण्या
नजर झुकुन गेली
हातात गुलाब देऊन
दुख पुसुन गेली
जवळ असुन दोघे
निशब्द असे बोल
काय बोलावे सुचेना
नजरेने जपला तोल
आजही गुलाब जपलेला
त्या क्षणांची आठवण
अशी माझी कविता
अनमोल भेटीची साठवण

