STORYMIRROR

Pooja Vaishnav

Tragedy

3  

Pooja Vaishnav

Tragedy

माझी चूक तरी काय??

माझी चूक तरी काय??

1 min
478

सरळ वागले तर मला म्हणतात 

खूपच बेहेनजी टाईप आहे

मनाने वागले तर म्हणतात

खूपच बोल्ड आहे

कोणी सांगेल का माझी चूक तरी काय??


जीन्स जरी असेल माझी फाटकी

थोडीच चरित्र ही मलिन आहे?

साडी घालूनही असते वाईट नजर तुमची मग ते चालतं काय?

कोणी सांगेल का माझी चूक तरी काय??


एकीकडे करतात उदोउदो महिलांचा

का मग दुसरीकडे तिला पेटवतात आहे,

का तिच्या स्त्री असण्याचा तिला दरवेळीच त्रास होत आहे.

कोणी सांगेल का माझी चूक तरी काय??


आपली आईचा, आपल्या बहिणीचा सगळेच करतात आदर,

मग बाकीच्या स्त्रियांना का हा वेगळा अनादर.

ती पण तर आपल्या आईसारखी आणि बहिणी सारखीच असते सोज्वळ. नका करू हा दूजाभाव.

कोणी सांगेल का माझी चूक तरी काय??


अरे तिच्या गर्भात राहतात आनंदाने, तो श्वास एक एक तीच पुरवत असते,

मग तोच श्वास का तिलाच परत मिळतो अगदी यातांनानी भरलेला, जेव्हा ती दुसर्याची मुलगी असते. लहान मुली, तरुणी, अगदी स्त्रिया ही घाबरतात ह्याला गोष्टीला.

कोणी सांगेल का माझी चूक तरी काय??


सुधारा आता तरी करा स्त्रियांचा आदर, नाहीतर एक दिवस असा उजाडेल की स्त्रीचा अस्तित्व असूनही दिसणार नाही.

आणि मग तुम्हाला हा प्रश्न पडेल कि माझी चूक तरी काय, मग. त्या चुकीच्या प्रश्नाचं उत्तर चपरकीन द्यायला देखील ती नसे



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy