माझा होणार....
माझा होणार....
छापा पडताच मी तुझी होणार
काटा पडताच तू माझा होणार....
घेवून हातात मी प्रेमाचं नाणं
मारू नको काळजावर बाण
मी तुझी कुठे नाही जाणार....
तुझ्यासाठीच मी सजते सवरते
होशील तू कोणाचा मी घाबरते
तुझाच साजणा मी हात धरणार....
तुझ्या प्रेमासाठीच मी जगते
तू हसावं म्हणून मी रडतं असते
तुझ्याच नावाचं मी कुंकू लावणार....
सून मी होणार मी गावची
मेहंदी लावते मी तुझ्या नावची
माझा प्राण मी तुझ्या मिठीत सोडणार....

