STORYMIRROR

Madhuri Nagine

Inspirational

3  

Madhuri Nagine

Inspirational

कविता

कविता

1 min
262

आयुष्यात अपेक्षेचे पाहता महत्त्व

त्यावर ठरले जगण्याचे तत्त्व

  अपेक्षांचे हे ओझे घेऊन

  जगतो आहे माणूस जीवन

अपेक्षांची होता पूर्ती

मनुष्य ठरतो देवमूर्ती

   जशा वाढती याच अपेक्षा

    जगण्याची होई अशी उपेक्षा

नाती थरली यावर सारी

संपता वाटे सारे जड भारी

    कुणी न कुणाचे उरते येथे

    हीच अपेक्षा संपते जेथे

हिच्या मोहातून सुटले जे पण

अंगी त्यांच्या आले संतपण.


Rate this content
Log in

More marathi poem from Madhuri Nagine

Similar marathi poem from Inspirational