आई
आई
1 min
194
तुझं 'बाई' असणंच विरून गेलं ग,
झाल्यानंतर तू 'आई'
लेकरांचं करता करता गुंतून
गेलीस, कसं होऊ ग उतराई?
स्वतःची ओळख सांडून
आईपणच राहिलीस मिरवत
कसला हा निःस्वार्थी भाव तुझा
मुलांच्या सुखाचे स्वप्न बघत
रामाची माय कौसल्या
कान्हाची जशी यशोदा
शिवबाची थोर जिजाऊ
घडवी जगी श्रेष्ठत्व सदा
हिरकणीने उतरला कडा
तिच्या तान्ह्यासाठी,
आईपणाची थोरवी गातो
साक्षात तो जगजेठी
आई,कसं होऊ ग उतराई?
वात्सल्याच्या दुधाची तू घट्टसर सायी
आयुष्याच्या संध्याकाळी
तिला साथ देऊ या जरा,
प्रतिबिंब होऊन तिचे
आनंद देऊ या खरा🙏🙏
