कविता नको ना दूर जाऊ तू
कविता नको ना दूर जाऊ तू
नको ना दूर जाऊ तू, जिवाला घोर लावू तू
अशी बाहूत ये माझ्या, नको ना भाव खाऊ तू
अशा एकांत वेळी हात हाती दे सखे माझ्या
नको विरहात जाळू भैरवीचे सूर गाऊ तू
दिवाना याचना करतो प्रीतीची भीक दे साधी
मृगावानी नको फसव्या जळापाठीच धावू तू
जरी ही रात काळी बघ, उद्याचा सूर्य अपुला गं
फुलावाणी हसावी तू नको नाराज राहू तू
शिकवली प्रीतीची बाराखडी उद्धारण्या घरटे
तुझा मी ज्योतिबा आहे सखे माझीच साऊ तू

