STORYMIRROR

Tanaya (तनया) Shinde (शिंदे)

Tragedy

3  

Tanaya (तनया) Shinde (शिंदे)

Tragedy

कथा

कथा

1 min
481

कोसळू देत दरडी नि ओसांडू देत नद्या

गावच्या गावं जलमय होईपर्यंत

माणसे नि जनावरे सगळंच निपचित

भगवे असू देत किंवा मग हिरवे

निसर्गाच्या डावात सगळेच अभिमृष्ट

डझनभर खपू देत किंवा मग शे पाचशे 

सामान्य माणसाच्या मृत्यूची 

कहानीही फुटकळ च म्हणायची

कथा तर असामान्यांची होत असते!

मग बुडू देत का बोट अजून एखादी?

पण तेच ते काळे बरबटलेले कृश 

हडकुळे नि हतबल चेहरे नकोत यावेळी

धष्टपुष्ट नि सत्तेने उन्मत्त झालेले 

रुबाबदार चेहरे जरा कमीच सापडतील

दोनशे अठ्ठ्याऐंशी किंवा मग पाचशे त्रेचाळीस?

निसर्गा, बघ तुझ्या नियमात बसतंय का

नाही तर, घे की एकदा टेबलाखालून

कथा मात्र एक नंबर होईल.. अगदी अविस्मरणीय!


(288- महाराष्ट्र विधानसभा आमदार संख्या

543- लोकसभा खासदार संख्या)



Rate this content
Log in

More marathi poem from Tanaya (तनया) Shinde (शिंदे)

Similar marathi poem from Tragedy