कसोटी सुखाची
कसोटी सुखाची
रुसलेल्या नशिबावर,
मनगटाची हिम्मत कोरी असते...
जिंकणाऱ्या माणसाला,
व्यवस्थेची शिरजोरी असते...
कमावलेल्या बुद्धीला,
कुजलेली संगत असते...
कितीही द्या तेलपाणी,
तरीही जुनीच पंगत असते...
सुखे चांदन्यांपरी आजही,
नुसतीच स्वप्ने उराशी असते...
शब्दे ओठावर पाठांतरांची,
अन दुसरेच तुपाशी असते...
सोबतीही अशीच काहीशी,
कागदांच्या तन-मनात असते...
डागाळलेली कागदेही मग,
दलालांच्या मग्न धनात असते...
पदरमोड नित्याची आता,
मुक्त सुखे कुणाची असते...
दूर चालल्या पायवाटा,
फक्त कसोटी आमची असते...
