कसा मला टाकुनी गेला राम
कसा मला टाकुनी गेला राम
कसा मला टाकुनी गेला राम ॥
रामाविण जीव व्याकुळ होतो ।
सुचत नाहीं काम ॥
कसा मला टाकुनी गेला राम ॥
रामाविण मज चैन पडेना ।
नाहीं जिवासी आराम ॥
एका जनार्दनीं पाहुनी डोळा ।
स्वरूप तुझें घनश्याम ॥
कसा मला टाकुनी गेला राम ॥
रामाविण जीव व्याकुळ होतो ।
सुचत नाहीं काम ॥
कसा मला टाकुनी गेला राम ॥