STORYMIRROR

Swapnilam Swapnilam

Romance

1  

Swapnilam Swapnilam

Romance

कॉरपोरेट लव स्टोरी

कॉरपोरेट लव स्टोरी

1 min
2.7K


रोज ऑफिसला जाताना

एक गुड बाय किस देते,

आजतरी लवकर ये

असे नेहमी मला म्हणते.


खूप दिवसांनी मिळाला आहे चान्स

आज घरी कोणी नाहीये

ये लवकर करुया थोडा रोमांस.


तुझे हे शब्द ऐकून

आज घरीच रहावसं वाटतं,

तुला माझ्या मिठीत घेऊन

असंच प्रेम करावसं वाटतं.


पण आजही ऑफिसला जायचंय

आणि आजही काम करायचंय,

थोड लवकर घरी येऊन

तुझ्यासोबत रोमांस पण करायचाय.


आज लवकर निघायचं तर नेमका

आजच बॉस वर्कलोड वाढवतो,

काम लवकर अाटपुन निघालो तर

ट्रेनच्या लफड्यात पडतो.


पण तुला दिलेल प्रॉमिस विसरून नाही चालणार,

आजपण लेट आलो तर तु माझ्याशी नाही बोलणार.

घरी आल्यानंतर तुला थोडा मस्काही मारायचाय

कारण आजतरी आपल्याला रोमांस करायचाय.


मी नेहमी लेट येतो

आणि नेहमी तु चिडते,

तरी रोज ऑफिसला जाताना

एक गुड बाय किस देते,

आणि आजतरी लवकर ये

असे नेहमी मला म्हणते.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance